About Us / आमच्याबद्दल

लेखा बंधू - भगिनींना सप्रेम नमस्कार...!! “आम्ही वीज वितरण क्षेत्रात काम करणाऱ्या लेखा कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी कटिबद्ध असलेली एक संघटना आहोत. आमचा उद्देश लेखा सदस्यांना एकत्र आणणे, त्यांचे अधिकार सुरक्षित करणे आणि त्यांना एक मजबूत व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे”.

वर्षानुवर्षे महावितरण मधील होत असलेल्या बदलानुसार इतर संवर्गाच्या मानाने लेखा संवर्ग कायम दुर्लक्षित राहिला आहे. लेखा कर्मचाऱ्यांवरील जबाबदाऱ्या वाढत गेल्या परंतु त्या तुलनेत वेतन तसेच लेखा कर्मचाऱ्यांना मिळणारी असमान वागणूक यामुळे लेखा कर्मचारी दडपणाखाली काम करत आहे.त्यामुळे विखुरलेल्या लेखा कर्मचाऱ्याचे एकत्रीकरण आवश्यक असल्याने जानेवारी-२०२५ च्या दरम्यान “The Accounts Team” या ग्रुप च्या माध्यमातून लेखा संवर्गाला एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु केला. ग्रुप चा मूळ उद्देश लेखा सर्वांगात एकी तयार करणे हाच होता. त्यानुसार हळूहळू एक विचार होऊन कर्मचाऱ्यांची जोडणी करण्यात आली.सुमारे १३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना एकत्रित जोडण्यात यश आले. संबंधित काम सुरु असताना पुनर्रचनेसारखा महत्वाचा मुद्दा समोर आला त्या अनुषंगाने ड्राफ्टींग टीम ची निर्मिती झाली. सदरील टीम ने आज पर्यंत एकून ४० पेक्षा हि जास्त VC घेऊन पुनर्रचना व लेखा कर्मचाऱ्यांचे हित जोपासणी यावर महत्वपूर्ण अभ्यास करून पुनर्रचनेबाबत प्रस्ताव प्रशासनाला सादर करण्याची रणनीती आखली.

सदरील प्रस्ताव अभ्यासपूर्वक मांडून १३०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या समर्थनाचे पत्र मुख्य कार्यालयास देण्यात आले.पुनर्रचना आराखडा मांडताना लेखा संवर्गा वर झालेला अन्याय अधोरेखित करण्यात सर्व संघटनांनी दुर्लक्ष केले तेंव्हा पासून सक्षम लेखा समर्पित संघटना नसलेची पोकळी जाणवली.तसेच परभणी येथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून लेखा कर्मचारी व अधिकारी यांच्यासोबत झालेल्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करण्यासाठी लेखासंवर्ग एकजूट झाला परंतु प्रशासनाने त्याची म्हणावी तशी दखल घेतली नाही.आपला लेखा संवर्ग विविध संघटनेमध्ये विखुरलेला असल्यामुळे इतर संघटनांनी आपल्यासाठी दिलेले योगदान न्यून असल्याचे स्पष्ट दिसून आले.

या सर्व प्रकरणामधून असे लक्षात आले की, लेखा संवर्गाच्या हिताचे मुद्दे मार्गी लावण्याकरिता आपले स्वतंत्र व्यासपीठ असणे खूप आवश्यक आहे.त्यामुळे ड्राफ्टींग टीमने “The Account Team” या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून लेखा कर्मचारी यांची स्वतंत्र संघटना असावी की नको या बद्दल जनमत घेतले.त्यातून नवीन लेखा संघटना स्थापन करावी असे जनमत मिळाले त्यामुळे फायनान्स अँड अकाउंट्स एम्प्लॉईज युनियन(Finance And Accounts Employees Union) ची निर्मिती झाली. तसेच समस्त लेखा संवर्गाचे हित साध्य करण्याचे आपले ध्येय आपण सर्वजण एकत्र येऊन पूर्ण करू शकतो हीच यामागील अपेक्षा आहे. केवळ लेखा कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी व सामुदायिक विकासासाठी लढणारी संघटना म्हणून उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वतोपरी सज्ज आहेत.

Finance And Accounts Employees Union (FAEU)...

चला तर समर्पक होऊ आणि बदल घडवू!